बोदवडमध्ये प्रभाग पाचमधील सार्वजनिक शौचालय पाडले

0

बोदवड : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील मलकापूर रस्त्यावर असलेले मॉडेल सार्वजनिक शौचालयासमोरील जुने शौचालय अज्ञात व्यक्तीने पाडल्याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी प्रीतेश भाऊसाहेब बच्छाव (26., सटाणा, जि.नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 18 जून रोजी मलकापूर रस्त्यावरील गट नंबर 186 मध्ये मॉडेल शौचालयसमोर असलेले जुने शौचालय अज्ञात व्यक्तीने पाडल्याने एक लाख रुपये किंमतीचे सहा सीटचे प्लॉस्टीक विटा व सिमेंटच्या बांधकाम पाडून नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास हवालदार कालिचरण बिर्‍हाडे करीत आहेत.