बोदवडमध्ये बसमध्ये चढताना विवाहितेचे मंगळसूत्र लांबवले

0

बोदवड : बसमध्ये चढणार्‍या विवाहितेचे अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र लांबवल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजता घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार देवकाबाई विठ्ठल जंगले (60, येवती) या बुधवारी सकाळी 10 वाजता पती
विठ्ठल पांडुरंग जंगले यांच्यासह बोदवड येथे आल्या होत्या. परतीच्या प्रवासात दुपारी 12 वाजता बोदवड-मलकापूर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 10 ग्रॅम वजनाची व सुमारे 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. तपास हवालदार कालिचरण बिर्‍हाडे व संदीप वानखेडे करीत आहेत.