बोदवडला अवैधरीत्या मांस वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बोदवड : जनावरांची अवैधरीत्या कत्तल करून मांस वाहतूक केल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर 150 किलो मांस जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
लोणवाडी ते पिंपळगाव देवी रोडवरील पाण्याच्या टाकीच्या जवळ सार्वजनिक ठिकाणी आरोपी शे.जहांगीर शे.मुस्तफा (30, सीडफार्म, मुक्ताईनगर) व अल्पवयीन मुलास मंगळवारी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ओमनी (एम.एच.19 वाय.883) मधून मांस वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 22 हजार 250 रुपये किंमतीचे 150 किलो मांस जप्त करण्यात आले. कॉन्स्टेबल मनोहर मधुकर बनसोडे यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.