बोदवडला कापूस जिनिंगला आग

0
किरकोळ नुकसान ; शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय
भुसावळ :- बोदवड येथील सिद्धीविनायक कोटेक्स या कापूस जिनिंगला बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने किरकोळ नुकसान झाले. समजलेल्या माहितीनुसार दोन ते तीन गठाणी जळून खाक झाल्या तर शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय आहे. खबरदारी म्हणून जामनेर, वरणगाव फॅक्टरी, वरणगाव येथील अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले मात्र हे बंब पोहोचण्यापूर्वीच आग आटोक्यात आली. सुनील गुप्ता यांच्या मालकीची ही जिनिंग असल्याचे सांगण्यात आले.