बोदवडला बस चालकाला शिवीगाळ ; एकाविरुद्ध गुन्हा

0

बोदवड- बसचा दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून बसपुढे दुचाकीला लावून चालकाला दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याप्रकरणी राजेश अशोक खोंडे (रा.नाडगाव, ता.बोदवड) यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. एस.टी.चालक रवींद्र देवराम सुरवडकर (नवी दाभाडी, ता.जामनेर) हे बस (क्रमांक एम.एच.20 डी.9785) नेत असताना दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून त्यांनी दुचाकी बसपुढे आडवी लावत हुज्जत घालून दारूच्या नशेत चालकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास आंबेडकर चौकात घडली. तपास एएसआय दिनकर झायडे करीत आहेत.