बोदवडला मेडिकल व्यावसायीकाकडे भल्या पहाटे चोरी

0

बोदवड- शहरातील साकला कॉलनीतील रहिवासी व मेडिकल व्यावसायीक पवन चांदमल जैन (साकला कॉलनी, बोदवड) यांच्या घरातून चोरट्यांनी 8 रोजी पहाटे पावणे पाच ते पाच वाजेदरम्यान घरात प्रवेश करून रोकड व मोबाईल मिळून 39 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी जैन यांच्या तक्रारीवरून बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी जैन यांच्या पॅण्टच्या खिशातून 18 हजार 200 रुपयांची रोकड, 14 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल तसेच दोन हजार रुपये किंमतीचा व चार हजार 700 रुपये किंमतीचा मोबाईल मिळून एकूण 39 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. तपास एएसआय धायडे करीत आहेत.