बोदवड- घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बाहेरपेठ भागातून आठ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह तीन मोबाईल मिळून 57 हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी राजेंद्र रतनलाल गुप्ता (58, रा.व्यापारी, बाहेरपेठ, हनुमान मंदिराजवळ) यांच्या घराचा सोमवारी पहाटे एक ते तीन दरम्यान दरवाजा उघडा असल्याने चोरट्याने संधी साधली. चोरट्याने घरातून सात हजार रुपये किंमतीची चार ग्रॅमची अंगठी, सहा हजार रुपये किंमतीची एक सोन्याचे चार ग्रॅमचे मंगळसूत्र, 12 हजार 299 रुपये किंमतीच्या सोनी कंपनीचा मोबाईल, पाच हजार 719 रुपये किंमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल व 13 हजार 999 रुपये किंमतीचा एक मोटोरोला कंपनीचा मोबाईल, एक हजार 200 किंमतीचे पॉवर बँक लांबवले. तपास नाईक गजानन काळे करीत आहेत.