बोदवडसह रावेर तालुक्यात 10 अर्ज ठरले छाननीत अवैध

0

भुसावळ । भुसावळ विभागात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आखाडा तापला असून छाननीत बोदवड तालुक्यात दोन तर रावेर तालुक्यात आठ अर्ज अवैध ठरले. बोदवड तलुक्यातील कोल्हाडी, निमखेड, चिंचखेड प्र.बो., वडजी, धोंडखेड या पाच ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या 29 प्रभागातुन 78 सदस्य तर जनतेतून आठ सरपंच निवडले जातील.

बोदवड तालुक्यात दोन अर्ज अवैध
बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून त्यात कोल्हाडी, निमखेड, चिंचखेड प्र.बो., वडजी, धोंडखेडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सोमवारी अर्ज छाननीत कोल्हाडी येथील सरपंच पदासह सदस्य पदासाठी अनिता लक्ष्मण दांडगे यांचा अर्ज अवैध ठरला. निमखेड येथील सात जागांसाठी दहा सदस्यांचे अर्ज दाखल असून त्यात चार जागा बिनविरोध झाल्या आहेत तर सरपंच पदासाठी तीन अर्ज दाखल आहेत. धोंडखेडा येथील सातही सदस्य पदाच्या जागा बिनविरोध असून सरपंच पदासाठी मात्र चार अर्ज दाखल आहेत. वडजी येथे सरपंच पदासाठी तीन अर्ज दाखल असून सदस्य पदासाठी दाखल 17 अर्जांमध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. कोल्हाडी सदस्य पदासाठी 23 तर सरपंच पदासाठी चार अर्ज दाखल आहेत.

रावेर तालुक्यात आठ अर्ज ठरले अवैध
रावेर तालुक्यात 21 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 74 तर सदस्य पदासाठी 403 अर्ज एकूण दाखल होते. अर्ज छाननीत सोमवारी आठ अर्ज अवैध ठरले. त्यात थोरगव्हाण दोन, खिरवड एक, नेहते एक, वलवाडी तीन, सावखेडा खुर्द एक असे एकूण आठ अर्ज अवैध ठरले.

भुसावळ तालुक्यात 162 अर्ज वैध
भुसावळ तालुक्रात सहा ग्रामपंचारतीच्रा निवडणुका होत असून यात मोंढाळे, कन्हाळे बु.॥ व खुर्द, पिंपळगाव खुर्द, तळवेल, ओझरखेडा रा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सरपंच पदासाठी 32 तर सदस्य पदासाठी 130 अर्ज दाखल झाले होते. सर्व 162 अर्ज वैध ठरले.