बोदवड : ‘आंगण ते रणांगण’ भाजपा पदाधिकार्‍यांचे आंदोलन

0

बोदवड : महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. राज्यातील महा विकास आघाडी सरकार विरोधात शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंगण ते रणांगण अशा शिर्षकाखाली राज्यात भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

यांची होती उपस्थिती
राज्यात कोरोना संक्रमितांची दिवसेंदिवस वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजावारा, कापूस उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा असे मजकूर असलेले फलक हातात घेवून भाजपा तालुकाध्यक्ष विनोद कोळी यांच्या नेतृत्वाखाली राहत्या घरी एनगाव येथे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी एनगावच्या सरपंच अन्नपूर्णा विनोद कोळी व भाजपा शहराध्यक्ष किरण वंजारी यांनी सुद्धा त्यांच्या राहत्या घरी आंदोलन केले.