बोदवड ग्रामीण रुग्णालयात अखेर लाईट फिटींगच्या कामाला सुरुवात

0

बोदवड : संपूर्ण देशासहित राज्य कोरोना विषाणूच्या संकटात सापडलेले असतांना आरोग्य विभाग सतर्कतेने व जबाबदारीने काम पार पाडत आहे. परंतु या पार्श्वभूमीवर बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क लाईट फिटिंग नादूरुस्त असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शहरातील ग्रामीण रुग्णालयातील लाईट फिटिंग नादूरस्त असल्यामूळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे रुग्णालयातील लाईट्स, पंखे सुरू होण्यास अडचणी येत होत्या. शिवसेनेचे तालुका संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक कलिम शेख, गोपाळ पाटील, पंकज वाघ व नईम खान यांनी या संदर्भात पाठपुरावा करीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ही बाब कळवल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कामाला सुरुवात झाली.

तत्काळ उपाययोजनांची मागणी
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर बोदवडातील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ लाईट फिटिंगचे काम व्हावे याकरीता सार्वजनिक विभागाचे उपअभियंता बेंडकूळे व भंडारी यांना भेटून सदरील प्रकार कळवत तात्काळ सोडविण्याची मागणी केली. या पार्श्वभूमिवर 19 मार्च रोजी जळगाव येथे जाऊन सा.बां. ईलेक्ट्रीकल विभागाचे जिल्हा अभियंता चव्हाण यांना भेटून ग्रामीण रुग्णालयातील नादूरुस्त फिटिंगमूळे मोठा अपघात होऊ शकतो याबाबत तात्काळ ऊपायोजना करण्याची मागणी केली होती. त्याच्या दूसर्‍याच दिवशी खर्चाचे अंदाजपत्रक मागविले होते. सदरील प्रकार आमदार चंद्रकांत पाटील यांना कळविताच त्यांनी तात्काळ काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यामूळे प्रत्यक्ष काम सुरू झाले असून आता ते शेवटच्या टप्प्यात आल्याने नागरीकांत आनंद व्यक्त होत आहे.