82 व्यावसायीकांना नोटीसा ; चौपदरीकरणाच्या कामाला वेग
मुक्ताईनगर- जामनेर तालुक्यातील पहुर ते मध्यप्रदेशातील इच्छापुरपर्यत रस्ता चौपदरीकरणाचे व काँक्रिटीीकरणाचे काम सुरू असून हा रस्ता मुक्ताईनगर शहरातून जात असल्याने बोदवड चौफुली चौक ते खामखेडा रस्त्यावरील स्मशानभुमीपर्यंतच्या तीन किलोमीटर रस्त्याचे दुतर्फा अतिक्रमण केलेल्या 82 व्यावसायिकांना एमएसआरडीसी यांनी नोटीस दिलेल्या आहेत व लवकरच अतिक्रमण काढण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यातील पहुर, जामनेर, बोदवड मुक्ताईनगरमार्गे मध्यप्रदेशातील इच्छापुर हा रस्ता राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 753 एल म्हणुन घोषीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई (एमएसआरडीसी) नाशिक हे या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम करीत आहे. पहुर ते इच्छापुर 83 किलोमीटर प्रकल्पावर 128 कोटी रुपयेे खर्च आहे. मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या बोदवड चौफुली चौक ते मुक्ताईनगर शहरातून जाणार्या खामखेडा रस्त्यावरील स्मशानभुमी पर्यतच्या 3 किलोमीटर दरम्यानच्या रस्तच्या दोन्ही बाजुला असलेले नियमबाह्य अतिक्रमण काढण्यात येणार असून व्यावसायीकांनी अतिक्रमण न हटवल्यास होणार्या नुकसानीस दुकानदार स्वत: जबाबदार असणार असल्याचे नोटीसीत बजावण्यात आले आहे.