बोदवड : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी यांची बंद झाली करण्यात आली असून त्यांच्या जागी जामनेरचे मूळ रहिवासी असलेले व सध्या जळगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे हेमंत पाटी यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.
तत्कालीन तहसीलदारांविरुद्ध अनेक तक्रारी
तोंडाला मास्क न लावणे, कोरोनाच्या उपाययोजनेसाठी तालुक्याच्या परीस्थितीवर दुर्लक्ष करणे, गौण खनिज वाहतूकदारांना पाठीशी घालणे, नागरीकांना उडवा-उडवीची उत्तरे देणे या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हाधिकारी तसेच आमदार चंद्रकांत पाटील व आपले सरकार पोर्टलवर शिवसेनेकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, दीपक माळी, लालसिंग पाटिल, सचिन पाटिल, अमोल व्यवहारे, आतिश सारवान यांच्याकडून आमदार पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू होता व त्याला यश आले असून तहसीलदार रवींद्र जोगी यांची बदली करण्यात आली आहे.