बोदवड : बोदवड तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना एका प्रकरणात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी एक हजार रुपये दंड सुनावल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2005 मधील कलम 10(1)(क) नुसार ही कारवाई करण्यात आली.
नागसेन राजाराम सुरळकर (रा.नाडगाव) यांनी वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मित्रण्यासंदर्भात तहसीलदारांकडे ऑनलाईन अर्ज पाठवले होता मात्र तक्रारदाराला मुदतीत सेवा न मिळाल्याने त्यांनी प्रांतांकडे तक्रार केली. तहसीलदार व तक्रारदारांच्या खुलाशांचे अवलोकन प्रांतांनी केल्यानंतर थोरात यांना दंड सुनावला. हा दंड शासकीय निधीत जमा करण्याचे नमूद करण्यात आले.