बोदवड तालुका अखेर हगणदारीमुक्त घोषीत

0

बोदवड। बोदवड तालुका हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले हेाते. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 9 हजार 133 शौचालय उद्दिष्ट देण्यात आले होते. ते आज अखेर 100 टक्के पूर्ण करण्यात आले असून बोदवड तालुका हा 100 टक्के हागणदारीमुक्त झालेला आहे.

बोदवड तालुक्यात 38 ग्रामपंचायत असून 38 ग्रामपंचायत इष्टांक पूर्ण झालेला आहे. सदर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय उभारणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर, राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व पंचायत समिती बोदवड सभापती, गणेश सिताराम पाटील, उपसभापती दिपाली राणे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील, भानुदास गुरचळ, पंचायत समिती सदस्य प्रतिभा टिकारे, किशोर गायकवाड यांचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी सहकार्य केले.