बोदवड : संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्षात रुपांतर झाल्याची घोषणा केल्यानंतर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी केली जात आहे. तालुकाध्यक्ष सुनिल सपकाळ यांनी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणुका लढविण्यावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केेले.
शेतकर्यांच्या शेतमालाला हमी भाव व दारुमुक्त गाव या अजेंड्यावर संभाजी ब्रिगेड बोदवड तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे चार गण स्वबळावर लढणार आहे. यामध्ये मनुर, नाडगाव गट, साळशिंगी शेलवड गट, मनुर बु. गण, नाडगाव, शेलवड गण, साळशिंगी गण येथे उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सपकाळ यांनी दिली.