बोदवड : तालुक्यातील दोन भागातून चोरट्यांनी दोन दुचाकी लांबवल्या. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरींचे सत्र सुरू झाल्याने घबराट
तक्रारदार व किराणा व्यावसायीक मनोज चांदमल जैन (साकला कॉलनी, बोदवड) यांनी त्यांची 22 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.डी.4002) नाडगाव रोडवरील जेडीसीसी बँकेसमोर लावली असता चोरट्यांनी ती 21 रोजी दुपारी चार वाजता लांबवली. दुसर्या घटनेत तक्रारदार गोविंदा काशीनाथ मोझे (वराड बु.॥, ता.बोदवड) यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.5645) ही वराड गावातील घरासमोरून चोरट्यांनी 30 रोजी सकाळी चोरट्यांनी लांबवली. तपास नाईक शशीकांत शिंदे व संदीप वानखेडे करीत आहेत.