बोदवड तालुक्यात खनिज तेलाचे संशोधन

0

बोदवड (गोपीचंद सुरवाडे) – भारत सरकार अंतर्गत असलेली ओएनजीसी ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन व पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तीन वर्षांत गॅस, पेट्रोल, कोळसा, खनिज तेल यांसारख्या खनिजांचे संशोधन ओएनजीसी कंपनीने बोदवड तालुक्यात सुरु केले असून बोदवड-जामनेर रस्त्यावरील सरकारी गोदामासमोरील मधू अंबुसकर यांच्या शेतात 90 ते 100 फूट बोअर करुन उपग्रहाद्वारे इन्स्ट्रुमेंट व्हॅनच्या मधील यंत्रांची संलग्न करुन दरतासाला घडलेल्या घटनांची नोंद घेतली जात आहे.
या संशोधनासाठी नायजेरियन तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.

शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान
बोदवड ते मध्यप्रदेशच्या अखेरच्या सीमाहद्दीपर्यंत तेल, ऑईल, कोळसा, खनिज तेल व इतर खनिजांचे संशोधन ओएनजीसी व पेट्रोलियम मंत्रालय तीन वर्षांपासून करीत आहे. या संशोधनासाठी शेतकर्‍यांच्या दोन किमी परिसराची आवश्यकता असते. या दोन किमी परिसरात 60 फूट, 90 फूट, 100 फूट जमिनीचा भाग पाहून उभे बोअर त्या परिसरात करुन ब्लास्टींग केले जाते. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. परंतु शेतकर्‍याला त्याची नुकसान भरपाई कंपनी करुन देते. शेतकर्‍यांच्या शेतातून कोणताही रस्ता, रेल्वे किंवा पाट जात नसून फक्त नैसर्गिक खनिज तेलाचे, गॅस, कोळसा व पेट्रोलसारख्या खनिजाचे साठे शोधण्यासाठी संशोधन होत आहे. शेतकर्यांनी या संशोधनासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी. कंपनीकडून याची नुकसान भरपाई मिळेल. तसेच कंपनीने राज्य शासनाच्या महसूल, गृह व वित्त मंत्रालयाकडून स्फोटक परवाना घेवून संशोधनाला सुरुवात केली आहे, असे क्षेत्रिय अधिकारी श्रीनिवास व किशोर यांनी दै. जनशक्तिशी बोलतांना सांगितले.