बोदवड तालुक्यात दुसर्‍या टप्प्यात 25 गावे हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर

0

बोदवड। शहरापाठोपाठ आता तालुक्यानेदेखील हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गंत पंचायत समितीच्या प्रयत्नांतून आतापर्यंत 12 गावे पहिल्या टप्प्यात हागणदारीमुक्त झाली. दुसर्‍या टप्प्यातील 25 गावेदेखील आघाडीवर असून 31 मे पर्यंत तेथील उघड्यावरील हागणदारी बंद होणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गंत प्रत्येक गाव, शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

यानुषंगाने बोदवड तालुक्यात वैयक्तिक, सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीवर भर आहे. याचे चांगले परिणाम समोर येत आतापर्यंत चिंचखेड प्रबो, चिंचखेडसिम, गोळेगाव, हरणखेड, करंजी, लोणवाडी, मानमोडी, निमखेड, राजूर, सुरवाडे खुर्द, वडजी, वाकी, विचवे ही 13 गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत. तर आमदगाव, भानखेडे, चिखली बुद्रूक, धोंडखेड, घाणखेड, हिंगणे, जलचक्र बुद्रूक, जामठी, जुनोने दिगर, कोल्हाडी, कुर्‍हा हरदो, मनूर बुद्रूक, मनूर खुर्द, मुक्तळ, नाडगाव, नांदगाव, साळशिंगी, शेलवड, शिरसाळे, सुरवाडे बुद्रूक, वराड बुद्रूक, वरखेड बुद्रूक, वरखेड खुर्द, एणगाव येवती ही 25 गावे हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करत आहेत. येत्या 31 मे अखेर या गावांना अस्वच्छतेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी गटविकास अधिकारी ए.डी.बावस्क, विस्तार अधिकारी आर.एस.सपकाळे, ग्रामसेवक, सरपंच परिश्रम घेत आहेत.