बोदवड तालुक्यात नकारात्मक मतांचा टक्का वाढला

0

बोदवड । नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत नाडगांव – मनुर बु. गट व साळशिंगी शेलवड गटात 428 नकारात्मक मतांची नोंद करण्यात आली आहे. तर पंचायत समितीच्या एकूण चार गणात 398 मतांची नोंद झाली. असे एकूण दोन गट व चार पंचायत समिती गणात एकूण पोस्टल मतांची 112 नोंद करण्यात आली आहे. नाडगांव मनूर बु. गटात एकूण 321 मतदारांनी नकारात्मक मत नोंदविले. तर 18 मते पोस्टाने आली. 18 मतांपैकी भाजपाचे भानुदास गुरुचळ यांना 11 मते, काँग्रेसचे अजय गवळे यांना 4 मते तर शिवसेनेचे सुरेंद्र पालवे यांना 2 मते एक पोस्टल नोटा मत नोंदविण्यात आले आहे.

साळशिंगी-शेलवड गटात 106 नोटा मत
साळशिंगी-शेलवड गटात एकूण 106 मतदारांनी नकारात्मक मते नोंदविली. टपाली मतदान 40 पैकी भाजपाच्या वर्षा पाटील यांना 28 मते तर राष्ट्रवादीच्या अंकिता पाटील यांना 12 मते मिळाली. नाडगाव गणात एकूण 146 मतदारांनी नोटा मते नोंदविली. तर टपाली 7 मतांपैकी भाजपाच्या दिपाली राणे यांना 3 मते, काँग्रेसच्या शोभा पाटील यांना 2 मते, अपक्ष उषाबाई राणे यांना 2 मते मिळाली. मनूर बु. गणात 76 मतदारांनी नोटा मते नोंदविली. तर 11 मते पोस्टलद्वारे भाजपाच्या प्रतिभा टिकारे यांना 9 मते, काँग्रेसच्या लता देवकर यांना 1 मत तर सेनेच्या सुषमा फिरके यांना 1 मत मिळाले. साळशिंगी गणातून 62 मतदारांनी नोटा मते नोंदविली तर टपाली 11 मते झाली. त्यापैकी भाजपाच्या किशोर गायकवाड यांना 11 मते सेनेच्या अनिता अवचारे यांना 4 मते मिळाली.

साळशिंगी केंद्रात कमी मते
शेलवड गणात एकूण 114 मतदारांनी नकारात्मक मत नोंदविले. तर पोस्टलद्वारा 28 मतांपैकी भाजपाच्या गणेश पाटील यांना 14 मते, राष्ट्रवादीच्या रामचंद्र म्हस्के यांना 13 मते तर शिवसेनेचे मुकेश महाजन यांना 1 मते मिळाले. उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना टपाली मते शुन्य मिळाली. नाडगाव मनूर गटातील वरखेडे बु. मध्ये 51 नकारात्मक मते नोंदविली. सर्वात कमी नकारात्मक मते साळशिंगी शेलवड गटात झाली. साळशिंगी केंद्रावर 27 मते, नाडगाव गणात वरखेडे बु. 33 मते, मनूर बु. 23 मते, साळशिंगी गणरात साळशिंगी केंद्रावर 16 मते नकारात्म नोंदविण्यात आली आहेत.