बोदवड । तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट असून नाडगाव-मनूर बुद्रुक गट अनुसुचित जातीसाठी राखीव आहे तर साळशिंगी-शेलवड गट महिला सर्वसाधारण राखीव आहे. नाडगाव मनूर बुद्रुक गटात भाजपाचे भानुदास गुरचळ, काँग्रेस राष्ट्रवादीचे अजय गवळे, शिवसेनेचे सुरेेंद्र पालवे, राष्ट्रवादी पुरस्कृत महेंद्र सपकाळे, बहुजन समाज पक्षाचे कैलास इंगळे अशी पंचरंगी लढत असून भाजपा व काँग्रेसपुढे शिवसेनेने व अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत महेंद्र सपकाळे यांनी आव्हान उभे केले आहे.
बहुजन समाज पक्षाचे कैलास इंगळे यांचा हत्ती सुध्दा जोरात पळत आहे. परंतु हा गटात भाजपाची सत्ता होती. यासाठी भाजपा पुन्हा गट ताब्यात ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे तर शिवसेनेचे सुरेंद्र पालवे यांनीसुध्दा कंबर कसली आहे. या गटाची विभागणी झाल्यामुळे भाजपला तोटा होतोे की नुकसान हे 23 ला समजेल.
भाजपाने काहींना उमेदवारी न दिल्याने नाराजी
नाडगाव-मनूर बुद्रुक जिल्हा परिषद गटात भानुदास किटकूल गुरचळ भाजपा, सुरेंद्र अवचित पालवे शिवसेना, अजय पंडीत गवळे काँग्रेस, महेंद्र बळीराम सपकाळे अपक्ष, कैलास वासुदेव इंगळे बहुजन समाज पार्टी असे एकूण पाच उमेदवार रिंगणात असून या लढतीमुळे प्रत्येक पक्षासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसने सुरेंद्र पालवे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारली आहे. भाजपाकडे सुध्दा चार-पाच उमेदवारांनी मागणी केली होती परंतु भानुदास गुरचळ हे सर्वात जुने कार्यकर्ते असल्यामुळे पक्षाने योगेश सुर्यवंशी, आर.पी. तायडे, सेवा गटविकास अधिकारी यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही. यामुळे काँग्रेस, सेना, भाजपा व अपक्ष पुरस्कृत उमेदवार महेंद्र सपकाळे अशी चौरंगी लढत होणार आहे. नाडगाव-मनूर गटातील एनसीपी मतदार स्थानिक उमेदवाराला निवडून देणार की बाहेरच्या उमेदवाराला याकडे लक्ष लागून आहे. साळशिंगी-शेलवड गटातून वर्षा रामदास पाटील भाजपा, अंकिता संदिप पाटील राष्ट्रवादी, ज्योती संदिप बिजागरे अपक्ष, निर्मला प्रभाकर पाटील शेतकरी कामगार पक्ष, सुषमा जनार्दन गायकवाड बसपा, कविता घेटे अपक्ष असे सहा उमेदवार रिंगणात असून ज्योती संदिप बिजागरे या माजी पंचायत समिती सदस्य पांडूरंग बिजागरे यांची सून असून निर्मला प्रभाकर पाटील या मनूर बुद्रुक माजी सरपंच व राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले युवा नेते सागर पाटील यांची आई असून या दोघांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अॅड. रविंद्रभैय्या पाटील यांची सून यांना तगडे आव्हान दिले आहे. तसे पाहिले तर भाजपाच्या वर्षा पाटील या बाजार समितीचे संचालक रामदास पाटील यांची पत्नी असून या गटात राष्ट्रवादी, भाजपा, शेतकरी कामगार पक्ष व बहुजन समाज पार्टी व अपक्ष दोन महिला अशी पंचरंगी लढत असून खरी लढत भाजपा, राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे.
चार गणातील सर्वपक्षीय उमेदवारांची अशी लढत
नाडगाव गणात काँग्रेसच्या महिला शोभा पाटील, भाजपाच्या दिपाली जीवन राणे, राष्ट्रवादी पुरस्कृत उषा राणे तर बसपाच्या ममता कैेलास इंगळे यांच्यात चौरंगी लढत असून हा गण भाजपाच्या ताब्यात होता. या गणातील उमेदवारांचे भविष्य भाजपाचे नेते मधु राणे, काँग्रेसचे राणे, जी.एन. पाटील, माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील यांचे राजकीय खेळीवर अवलंबून आहे. या गणात कधी भाजपाचा उमेदवार विजयी होतो तर कधी काँग्रेसचा सामाजिक गणितावर या गणाची खास ओळख आहे.
मनूर बुद्रुकच्या गणात पंचरंगी लढत असून भाजपाच्या प्रतिभा टिकारे, काँग्रेसच्या लता सुभाष देवकर, शिवसेनेच्या सुषमा संजय फिरके, अपक्ष संगिता विक्रम पाटील व बहुजन समाज पक्षाच्या वैशाली प्रदिप वाघ, नर्मदाबाई गोविंदा ढाके अपक्ष या रिंगणात असून मनूर गणातून यापूर्वी हरिभाऊ वरकड यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. भाजपा तालुकाध्यक्ष यांची सून प्रतिभा टिकारे व मनूर बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य सुभाष देवकर यांची पत्नी लता देवकर, मनसेचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंग पाटील, शिवसेनेचे सुषमा फिरके व बहुजन समाज पार्टी वैशाली वाघ या तीन उमेदवारांमुळे भाजपा व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तगडे आव्हान दिले आहे. भाजपा शिवसेना विजय प्राप्तीसाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. एकंदरीत बोदवड तालुक्यातील सर्वसामान्य जनता भाजपासह राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे दिसून येते. मात्र 23 तारखेला जनता विजयाची माळ कोणाच्या गळ्यात टाकेल हे निकालावरुन समजेलच.
साळशिंगी गण अनुसुचित जाती राखीव असून या गणात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ व शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार गोपीचंद सुरवाडे यांनी कडवे आव्हान दिले आहे. भाजपाचे किशोर गायकवाड, राष्ट्रवादी आघाडीचे अनिल मोरे, शिवसेनेच्या संगिता अवचार, भारिप बहुजन महासंघ व शेतकरी कामगार पक्षाचे गोपीचंद सुरवाडे अशी चौरंगी लढत असून साळशिंगी गण राष्ट्रवादीचा गण मानला जातो. परंतु राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातील मतभेदामुळे दरी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने नाडगाव – मनूर गटात अपक्षांना पुरस्कृत केल्यामुळे वाद झाल्याचे समजते.
शेलवड गणात चौरंगी लढत असून भाजपाचे गणेश पाटील, काँग्रेसचे पुरुषोत्तम पाटील, राष्ट्रवादीचे रामचंद्र म्हस्के, शिवसेनेचे मुकेश महाजन अशी लढत आहे. माजी आमदार हरिभाऊ जवरे यांचे गाव असून जवरे कुटुंबातील विद्यमान सदस्य रविंद्र जवरे यांना व त्यांचे बंधू विश्वास जवरे यांना भाजपाने उमेदवारी नाकारुन अनेकांना नाराज केल्याचे समजते. शेलवड गण हा सुध्दा राष्ट्रवादीचा गण मानला जातो. परंतु शिवसेनेचे मुकेश महाजन यांनी भाजपा व राष्ट्रवादीला कडवे आव्हान उभे केले आहे. भाजपा, राष्ट्रवादीला जनतेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत बोदवड तालुक्यात पाच वर्षांतील मनरेगा, रस्ते कामातील भ्रष्टाचार, वैयक्तिक सिंचन लाभार्थ्यांची नाराजी, सत्ताधार्यांसह राष्ट्रवादीवर सुध्दा दिसून येते.
– गोपीचंद सुरवाडे
9823966423