शासन आदेशाला केराची टोपली : पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा
बोदवड : शहरासह परीसरात गुटखा विक्री जोमात सुरू असून तालुक्यातील खेड्यापाड्यावर रात्रीच्या वेळी गुटख्याचे पार्सल पोहचवीले जात आहेत. ही खुलेआम होणारी गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने चालते ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
संचारबंदीतही गुटखा विक्री जोमात
राज्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 144 संचार बंदी आदेश शासनाने लागू केलेले असतानादेखील बोदवड परीसरात खुलेआम गुटखा विक्री होत आहे त्यामुळे शासनाच्या संचारबंदी आदेशाला केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसून येत आहे. गुटख्यामुळे होणारे दुष्पपरीणाम तसेच गुटखा व तंबाखूमुळे होणारे आजार याबाबत वारंवार चित्रीत माहिती शासनाच्या वतीने नागरीकांना देण्यात येते तसेच गुटख्यामुळे अनेक नागरीकांचा वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच गुटखा खाल्यावर नागरीक उघड्यावर धुम्रपान व थुंकत अससल्याने कोरोना सारख्या भीषण आजाराला आमंत्रण देण्यासारखा प्रकार सुरू आहे.
ग्रामीण भागात चढ्या भावान गुटखा विक्री
संचारबंदीचा फायदा घेत काही विक्रेते विमल गुटख्याची पुडी 10 ऐवजी 20 ते 25 रुपये किंमतीत विकत आहेत. संचार बंदी काळात गुटखा विक्रेत्यांची चांदी होत असल्याचे बोलले जात आहे. अनेक वेळा गुटखा विक्रेत्यांचा मालही पकडला जातो मात्र त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्याचे तालुक्यात चित्र आहे तसेच संचारबंदी काळात बोदवड शहर परीसरात आजूबाजूच्या सर्वच गावांमध्ये गुटखा विक्री होत आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालय, मंदिर पराीसरात खुलेआम गुटखा विक्री होत असून युवक गुटख्याच्या आहारी गेलेले दिसुन येत आहे त्याच बरोबर दारु विक्रेत्यांचा उच्छादही वाढला आहे. तालुक्यातील बियरबार, हॉटेल्स बंद असतांना तालुक्यातील खेड्या-पाड्यांवर दारू विक्री जोरात सुरू आहे.
अवैध धंदे दाखवा : कारवाई करू
मुक्ताईनगर पोलिस उपअधीक्षक जाधव म्हणाले की, अवैध धंदे कुठे चालतात ते आम्हाला दाखवा आम्ही तत्काळ कारवाई करतो व आमच्या पोलीस कर्मचार्यांना तशा सुचना देऊ, असेही ते म्हणाले. विशेषतः सर्वसामान्य नागरीकांना जे अवैधखंदे खुलेआमपणे दिसत आहेत ते पोलिसांना का दिसत नाही? असा प्रश्न बोदवडक तालुकावासी उपस्थित करीत आहेत.