बोदवड- रावेर लोकसभा मतदारसंघातील बोदवड विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 55 टक्के मतदान झाले. सकाळी मतदाराचां उत्स्फूर्त प्रतिसाद असलातरी दुपारी उन्हामुळे मतदान केंद्रावर काहीसा शुकशुकाट होता मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या. तालुक्यात कुठलाही अनुसूचित प्रकार घडला नाही. बोदवड तालुक्यात सकाळी 15 टक्के मतदान झाले. दुपारी चार वाजेनंतर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी दिसून आली. ग्रामीण भागात मतदान कमी झाल्याचे चित्र होते. शहरातील 19 हजार 411 पैकी 10 हजार 943 मतदारांनी मतदारांनाचा हक्क बजावल्याने शहरात सुमारे 55.55 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.