बोदवड नगरपंचायत निवडणूक : 21 उमेदवारांची माघार

बोदवड : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण 74 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सोमवार, 13 रोजी 21 उमेदवारांनी माघार घेतली. 53 उमेदवार आता निवडणूक रींगणात आहेत.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपंचायतीवर वर्चस्वी कुणाचे असणार? हे तर निवडणुकीअंतीच स्पष्ट होणार आहे मात्र नेत्यांनी आपापल्या परीने फिल्डींग लावली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन हेदेखील भाजपासाठी येथे जोर लावणार आहेत.