बोदवड नगरपंचायत निवडणूक : चार प्रभागांसाठी अखेरच्या दिवशी 25 अर्ज दाखल

बोदवड : नगरपंचायतीच्या 13 प्रभागांची निवडणूक आटोपल्यानंतर चार ओबीसी प्रभांगासाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 25 तर यापूर्वी दाखल दहा मिळून मिळून एकूण 35 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काहींनी राजकीय पक्ष अथवा अपक्ष असे दोन अर्ज सुध्दा दाखल केले आहेत. चार प्रभागांसाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

10 जानेवारीपर्यंत माघारीची मुदत
नामनिर्देशन पात्र निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी 4 रोजी झाली तर 10 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख आहे. ही निवडणूक माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या चार जागांवरच शिवसेना व राष्ट्रवादीचे सत्ता समीकरणाचे सूत्र ठरणार असल्याने संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मंगळवार, 18 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.30वाजे पासुन मतदानाला सुरूवात होईल तर बुधवार, 19 तहसील कार्यालय येथे मतमोजणी होईल.

यांचे अर्ज झाले दाखल
अखेरच्या दिवशी सोमवारी चार प्रभागांमध्ये या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात प्रभाग दोनमधून रेखा निवृत्ती ढोले, संजय पंजाबराव पाटील, कडूसिंग पांडुरंग पाटील, महेंद्र प्रभाकर पाटील, अश्विनी विजयकुमार चौधरी, अकेश राजेंद्र अग्रवाल, जीवन कैलास बिजारणे, काजल कडूसिंग पाटील, संदीप अशोक तायडे, सचिन सुभाष देवकर तर प्रभाग क्रमांक तीनमधून योगीता गोपाळ खेवलकर, शुभांगी प्रवीण मोरे, पूनम निलेश माळी, कविता पवन जैन, विद्या भिकमचंद शर्मा, अर्चना अनिल खेवलक, सुजाता देवेंद्र खेवलकर, सपना राजेश नानवाणी तसेच प्रभाग पंधरामधून शाह मुजम्मिल शहा मुजफ्फर, शेख मुस्तकीम ईस्माईल, पिंजारी शेख तौफीक शेख अय्यूब, सचिन सुरेश भोई शिवाय प्रभाग क्रमांक 17 मधून फकीर रशीदाबी आलीमशहा, मोहिनी शुभम माळी, मीरा दिनेश माळी, रूपाली योगेश माळी व सुशिलाबाई सुभाष माळी आदी अर्ज सादर केला.