बोदवड नगरपंचायत ब्रेकिंग :प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा गायकवाड विजयी

बोदवड – बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला.

 

यावेळी त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले. तर उर्वरित उमेदवारांमध्ये भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) मिळाली