बोदवड नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

माजी मंत्री एकनाथराव खडसेंना पुन्हा धक्का : आगामी राजकीय समीकरणे बदलणार

बोदवड : मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील सहा सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत बोदवड नगराध्यक्षा मुमताज बी.सईद बागवान यांच्यासह 10 नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्याने पालिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मातोश्रीवर झालेल्या प्रवेश सोळ्यास मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांतजी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
नगराध्यक्षा मुमताज बी.सईद बागवान, देवेंद्र समाधान खेवलकर, आफरीन सय्यद असलम बागवान, सुशीलाबाई मधुकर खाटीक, अकबर बेग मिर्झा, सुशीलाबाई आनंदा पाटील, नितीन रमेश चव्हाण, सुनील कडू बोरसे, साकीनाबी शे.कलिम कुरेशी, आसमाबी शे.इरफान आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

यांची प्रवेशप्रसंगी उपस्थिती
प्रवेश सोहळ्यास शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई , विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, गटनेता तथा शहरप्रमुख राजेंद्र हिवराळे, नगरसेवक पियुष मोरे, मुकेश वानखेडे, आरीफ आझाद, दीपक संतोष माळी, अफसर खान, जमील बागवान, मोहसीन बागवान, रीतेश सोनार आदींची उपस्थिती होती.