बोदवड । हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषीदिन पंचायत समिती कार्यालयात साजरा करण्यात आला. सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, गटविकास अधिकारी ए.डी. बावस्कर, प्रगतशिल शेतकरी विकास कोटेचा, कृषी अधिकारी चौधरी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अधिकार्यांनी केले मार्गदर्शन
याप्रसंगी रविंद्र वाघ, मनोज बोदडे, राजू इंगळे, राजू शेजवळे, डिगंबर जंजिरे, भगतसिंग सोलंकी, पंचायत समिती पक्षाधिकारी आर.एम. ठाकुर, कार्यालयीन अधिक्षक आर.टी. काळेकृषी विस्तार अधिकारी ई.के. चौधरी, गटशिक्षणाधिकारी धनके, आरोग्य विस्तार अधिकारी सोनवणे, सी.जी. इंगळे, कृषी पर्यवेक्षक एस.एन. चौधरी, कृषी सहाय्यक ए.एस. सानप, ए.आर. कांगणे, व्ही.एम. भोसले, सहाय्यक अभियंता मयुर कोकाटे, एस.एम. पाटील, सोनाली रत्नपारखी, माधुरी नन्नवरे, चंद्रकांत सुरवाडे उपस्थित होते.