बोदवड पंचायत समिती सदस्यांचे सामूहिक राजीनामे सभापतीकडे

0

बोदवड- पंचायत समिती उपसभापती दीपाली राणे, सदस्य प्रतिभा टिकारे, सदस्य किशोर गायकवाड यांनी आपल्या पदाचे राजीनामे पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांच्याकडे सामूहिकरीत्या सोपवल्याने पंचायत समितीच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा परीषद व ग्रामपंचायत सदस्य परस्पर कामे करीत असल्याने पंचायत समिती सभापती व सदस्य याचे महत्व कमी होत असून त्यांना कोणतेही अधिकार नाही तसेच ग्रामपंचायत सरपंचांना थेट जिल्हा परीषदेकडून निधी परस्पर मिळत असल्याने व सरपंच यांचे मानधन पाच हजार रुपये मिळते त्या तुलनेत पंचायत समिती सभापती व उपसभापती याचे मानधन अत्यंत कमी असून पंचायत समितीचे महत्व कमी झाले आहे. शासनाकडे मागण्याचे निवेदन आम्ही दिलेले आहे. यावर विचार करावा अन्यथा आमचे राजीनामे स्वीकारावेत, असे निवेदनात नमूद आहे. सभापती, पंचायत समिती सदस्य व सभापती याचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार असल्याचे पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांनी सांगितले.