उपसभापतीपदी पदावर प्रतिभा टिकारे यांची वर्णी
बोदवड- पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपच्या साळशिंगी गणातून प्रथमचं राजकारणात प्रवेश केलेल्या व प्रथमच निवडून आलेले किशोर भीमराव गायकवाड यांची वर्णी लागली तर उपसभापती पदावर मनुर गणातून निवडून आलेल्या प्रतिभा निलेश टिकारे यांची वर्णी लागली. गुरुवारी तहसील कार्यालयात निवड प्रक्रिया राबवण्यात आली. अडीच वर्षांपूर्वी सभापतीपदी गणेश सीताराम पाटील व उपसभापती म्हणून दीपाली जीवन राणे होत्या. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड प्रक्रिया राबवण्यात आली. दरम्यान, बोदवड पंचायत समितीच्या चारही गणातून निवडून आलेले सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे असल्याने येथील पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे.