बोदवड बसस्थानकावर बसची धडक; बेटावदचा वृद्ध गंभीर जखमी

0

बोदवड- भरधाव बसने धडक दिल्याने जामनेर तालुक्यातील बेटावद येथील 62 वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना 31 मे रोजी बसस्थानकासमोर घडली. जखमीवर उपचार सुरू असल्याने त्यांनी गुरुवारी तक्रार दिल्यावरून अज्ञात बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार राजाराम सोनू वखरे (62, रा.बेटावद, ता.जामनेर) 31 मे रोजी सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास बोदवड गावातहू बसस्थानकासमोर उभे असताना अज्ञात बसच्या चालकाने बेपर्वाईने बस चालवून धडक दिल्याने वखरे यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली. अपघातानंतर चालकाने खबर न देता बस नेल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार दिनकर झायडे करीत आहेत. दरम्यान, अज्ञात बसच्या चालकांचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.