बोदवड महाविद्यालयात वाणिज्य परीषदेचे 12 व 13 जानेवारीला अधिवेशन

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन करणार परीषदेचे उद्घाटन ; माजी मंत्री एकनाथराव खडसेंचीही राहणार उपस्थिती

बोदवड- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचे 30 वे अधिवेशन आयोजित करण्याचा सन्मान प्राप्त झाला असून सुमारे 29 वर्षानंतर खान्देशात हे अधिवेशन होत आहे. 12 व 13 जानेवारी होणार्‍या अधिवेशनाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते होणार असून देशातील व राज्यातील सुमारे 300 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य आणि 30 व्या अधिवेशनाचे सचिव प्रा.अरविंद चौधरी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून दि बोदवड सार्वजिक को-ऑप. एज्युकेशन सोसायटी लिमिटेड बोदवड संस्थेचे चेअरमन मिठुलाल अग्रवाल आहेत. राष्ट्रीय परीषदेचे उद्घाटन 12 रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते तर ‘30व्या अधिवेशनाचे’ उद्घाटन माजी मंत्री व विद्यमान आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होईल. प्रसंगी खासदार रक्षा खडसे उपस्थित राहतील. उपस्थितांना मार्गदर्शन करणेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू उद्धवजी भोसले, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य
पुणेचे संचालक धनराज माने, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे (नागपूर), राज्य वाणिज्य परीषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.टी.ए.शिवारे (मुंबई), सचिव प्राचार्य जी.वाय.शितोळे (पुणे), संस्थेचे उपाध्यक्ष अजयजी जैन, सचिव विकासजी कोटेचा, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.प्रकाशचंदजी सुराणा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशात 30 वर्षात प्रथमच महिला अध्यक्षस्थानी राहणार असून प्रा.डॉ.अमिषा अरोरा (नागपूर) कार्यक्रमाच्या अध्यक्षा असतील.

तीन विभागात होणार अधिवेशन
पहिल्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.किर्ती गुप्ता (भारती विद्यापीठ, पुणे) भूषवतील. सत्राचे समन्वयक म्हणून डॉ.रश्मी शर्मा (नाहाटा कॉलेज, भुसावळ) या काम पाहतील. दुसर्‍या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.विमल जैस्वाल (लखनौ विद्यापीठ) असतील. समन्वयक म्हणून डॉ.पवित्रा पाटील (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) हे काम पाहतील. तृतीय तांत्रिक सत्रात अध्यक्ष डॉ.शाम शुक्ला (केंद्रीय रिसर्च डेव्हेलपमेंट, नागपूर) हे काम पाहतील, तर समन्वयक डॉ.कल्पना पाटील (एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज, धुळे) या जबाबदारी सांभाळतील. सायंकाळी देशभरातून आलेल्या उपस्थितांसाठी ‘भजन संध्या कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले तर 13 जानेवारी रोजी सकाळी पुन्हा तांत्रिक सत्राचा प्रारंभ होईल. सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र वाणिज्य परिषदेच्या व्यासपीठावर खान्देशातील व्यापार, उद्योग, व्यवसाय यांच्या प्रगतीचा आढावा दर्जी फाउंडेशन चे संचालक गोपाल दर्जी हे आपल्या व्याख्यानातून व्यक्त करतील. सकाळी 11.30 वाजता महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आहे. दुपारी 12.30 वाजता राज्य वाणिज्य परिषदेच्या 30व्या अधिवेशनाचा समारोपम संस्थेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.प्रकाशचंद सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली होईल. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अजयजी जैन, सचिव विकासजी कोटेचा, दर्जी फाउंडेशनचे प्रमुख गोपाल दर्जी उपस्थित राहतील.

‘आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत’ लेख प्रसिद्ध होणार
विविध संशोधकांचे लेख ‘ 21 व्या शतकातील वाणिज्य व व्यवस्थापन’ या विषयावर मागविलेले असून, प्रत्यक्ष लेखाचे वाचन होणार आहे व छापील लेख विद्यापीठ अनुदान आयोग यादितील ‘आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत’ प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2018-19 साठीचा डॉ. पी.सी. शेजवळकर व महादेवराव तल्हार ‘उत्कृष्ठ वाणिज्य शिक्षक पुरस्कार’ तसेच शोध निबंधामधून ‘उत्कृष्ठ शोध निबंधक पुरस्कार’ ‘रमण पुरुषोत्तम’ या नावाने दिला जाणार आहे. तसेच तरुण प्राध्यापकांना प्रोत्साहन म्हणून सौरभ शिवारे स्मुर्ती प्रित्यर्थ ‘युवा संशोधक पुरस्काराची’ घोषणा करण्यात येईल.

अधिवेशनासाठी यांचे परीश्रम
सर्व अतिथींची निवास व्यवस्था भुसावळ येथे करण्यात आलेली असून निवास व्यवस्था जबाबदारी डॉ.मधुकर खराटे, डॉ.अकोश गोस्वामी, डॉ. मनोज निकाळजे हे सांभाळत आहेत. अधिवेशन यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी, उपप्राचार्य डी.एस. पाटील, प्रा.डॉ.मधुकर खराटे, प्रा.डॉ.प्रभाकर महाले, प्रा.डॉ.शरद काठोके, प्रा.डॉ.व्ही.पी.चौधरी, डॉ.पराग नारखेडे, डॉ.एस.जे.साळुंके, प्रा.अमेय लोहार, प्रा. डॉ.अपर्णा चंद्रस, प्रा.डॉ.कामिनी तिवारी, श्रीमती.हेमलता कोटेचा, प्रा.अजय पाटील, डॉ.रुपेश मोरे, डॉ.गीता पाटील, प्रा.नरेंद्र जोशी, विजय बडगुजर, प्रा.नितेश सावदेकर, बाबुराव हिवराळे, शेखरसिंग चौहान, वैभव कासार, जितेंद्र शर्मा, योगेश राजपूत, समीर पाटील, राजेंद्र मोपारी, नामदेव बडगुजर, जितेंद्र बडगुजर, सुभाष भोई, दीपक जोशी, अतुल पाटील, मुकेश बडगुजर आदींनी परीश्रम घेतले.