बोदवड महाविद्यालयात 17 रोजी प्राध्यापक करंडक वादविवाद स्पर्धा

0

बोदवड– बोदवड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयतर्फे प्रथम विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्राध्यापक करंडक वादविवाद स्पर्धा 17 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता होत आहे. वादविवादसाठी निवडलेला विषय, प्रस्ताव ज्वलंत प्रश्‍न, ताज्या घडामोडीशी संबंधीत आहे. स्पर्धा मराठी, हिंदी भाषेत घेतली जाणार आहे. स्पर्धा विद्यापीठस्तरीय असल्याने कला, वाणिज्य, विज्ञान अभियांत्रिकी विधी, फार्मसी आणि अन्य अभ्यासक्रमांतर्गत वरीष्ठ महाविद्यालय प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी होवू शकणार आहेत. वादविवाद स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचा किमान एका संघाचा सहभाग नोंदवून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. स्पर्धेसाठी 10 मिनिटे कालावधी असेल. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज 11 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयाच्या ई-मेलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विजेत्यांना प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह, द्वितीय तीन हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह, तृतीय दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह. विजेत्या प्रथम संघास कायमस्वरुपी प्राध्यापक करंडक दिला जाईल. सहभाग नोंदवण्याचे आवाहन विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा आयोजक समिती सदस्य प्रा.आर.एल.जवरास, ए.एन.चंद्रस, के.बी.तिवारी, प्रा.डॉ.मनोज निकाळजे यांनी केले आहे.