बोदवड मुख्याधिकार्‍यांविरुद्ध अ‍ॅट्रासिटी

0

बोदवड । बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. देशमुख यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगून लिपीक तुळशीराम किसन तायडे यांनी अ‍ॅट्रासिटी गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्त्यांच्या मोटारसायकलीमुळे नगरपंचायतच्या आवारात रस्त्यात लावल्यामुळे मुख्याधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या चारचाकी गाडीला अडथळा निर्माण झाला. यावरुन डॉ. निलेश देशमुख यांनी फिर्यादी तुळशीराम तायडे यास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याची तक्रार लिपीक तायडे यांनी दिली आहे.

प्रश्‍न सुटतील काय?
ही घटना 12 जुलै राजी 11 वाजेच्या सुमारास घडली. तर दुसर्‍या गुन्ह्यात मुख्याधिकारी देशमुख यांनी तुळशीराम तायडे व त्याचा मुलगा अभिषेक तायडे या दोघा पिता पुत्रांनी कामात अडथळा निर्माण करणे व मुख्याधिकार्‍यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे यावरुन गुन्हा दाखल केला आहे. नगरपंचायतीमध्ये कामांच्या निविदा काढल्या आहे. कर्मचार्‍यांचे पगार थकित आहे. कर्मचारी बोगस भर्तीमुळे नगरपंचायत कर्मचारी संपावर होते. नव्या वादाला तोंड फुटले आहे. सत्ताधार्‍यांना नियमबाह्य कामे करु देत नाही. बोगस कर्मचारी भर्तीसुध्दा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मुख्याधिकार्‍यांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करुन प्रश्‍न सुटतील काय?