बोदवड येथे आरपीआयतर्फे रास्तारोको आंदोलन

0

बोदवड। आरपीआय व एकलव्य विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आरपीआय जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार 24 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात आला. गेल्या 29/31 रोजी मलकापुर रस्त्याच्या देशी दारु दुकानावर रविंद्र सुभाष ठाकरे याच्या विरुद्ध पोलिस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला रात्री घरुन अटक करण्यात आली होती. त्या दिवसापासून सदर संशयीत आरोपी रविंद्र ठाकरे हा फरार आहे.

पोलीस प्रशासनाकडून त्याला सोडून दिल्याचे माहिती पडते तर 29 एप्रिल 2017 रोजी आरपीआय जिल्हाध्यक्ष नागसेन सुरळकर यांसह इतर कार्यकर्त्यांवर अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आलेली आहे. हे सर्व प्रकार पोलिसांनी पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनगर यांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. व कुठलीही चौकशी व तपास न करता सदर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा दिवसांत कारवाई करा
सदर कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे. आदिवासी समाजाचा रविंद्र ठाकरे कुठे आहे. विैंवा याचा शोध घेवून त्याला त्याच्या परिवाराकडे सोपवावा यासह पोलिस निरिक्षक चंद्रकांत बनगर यांच्यासह सहकार्‍यांवर गुन्हे दाखल करुन निलंबीत करण्यात यावे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाईल. यानंतर सुद्धा 10 दिवसांच्या आत काही कारवाही न झाल्यास नाशिक येथे उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष संजय तायडे, जिल्हा युवा अध्यक्ष मनोहर सुरळकर, राजु इंगडे, सदानंद वाघ, गोविंद तायडे, सुभाष सुरवाडे, सुभाष इंगळे, प्रमोद तायडे उपस्थित होते.