बोदवड। साकला कॉलनी येथील तक्षशिला बुध्द विहारात वर्षावास प्रारंभ करण्यात आला. प्रथम उपास के.एस. सुरवाडे, पी.एन. प्रधान, आशा तायडे, माधुरी नन्नवरे, उषा वाघ यांनी तथागत गौतम बुध्द यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण केला. त्रिशरण पंचशिल ग्रहण करुन के.एस. सुरवाडे यांनी उपासकांना खिरदान केले. भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष बी.के. बोदडे यांनी मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सिंधु निकम, संगिता इंगळे, कल्पना निकम, लिलाबाई हिरोळे, सुनिता सुरळकर, निर्मला सोनवणे, भारती इंगळे, रंजना बोदडे, वंदना सुरळकर, अनुसया प्रधान, सुधा तायडे, सुधाकर सपकाळे, पी.एन. प्रधान, अॅड. के.एस. इंगळे, रमेश तेलंग, वामन निकम, बळीराम बोदडे, रविंद्र गवळी, भाऊसाहेब सरदार, के.एल. बोदडे, सुधीर तायडे, संतोष निकम, बी.डी. इंगळे, भास्कर गुचरळ, बी.यु. पानपाटील, चैतराम सुरळकर, व्ही.बी. सोनवणे, अशोक तायडे, जीवन कढाले, पराग कोसे, महेंद्र सुरळकर, शेषराव सुरळकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार संदिप तायडे यांनी मानले.