बोदवड येथे तरुणाची विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या

0

बोदवड- शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील मयत अतुल मनोहर माळी (20) या तरुणाने सोममारी तपोवनमधील शेलवड रस्त्यावरील शेतात आपल्या शेतात काहीतरी विषारी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणी प्रभाकर धोंडु माळी यांनी दिलेल्या खबरीनुसार बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार संजय भोसले करीत आहेत.