बोदवड । शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुका नाभिक समाजमंडळाकडून संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माधव सुर्यवंशी, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अनंता वाघ, संतोष कुंवर, हरिभाऊ सुवर्से, नाभिक मंडळ तालुकाध्यक्ष कैलास भागवत, अमृत गाढे महाराज उपस्थित होते. यावेळी सुरज वसाने, श्रृती बोरसे, सुप्रिया वाघ, श्रध्दा भागवत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी संजय वाघ, अशोक बोरसे, राजू डापसे, गणेश सोनवणे, राजेंद्र बाभुळकर, निवास बाभुळकर, सोपान महाले, दिपक सोनवणे, प्रितम वर्मा, अनिल कडमकार, संजय बिडके, राजू शेळके आदी उपस्थित होते.