बोदवड । येथील तहसिल कार्यालयासमोर शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारने निवडणूक काळात दिलेल्या जाहिरनाम्याप्रमाणे एकही काम केले नसल्याचा आरोप करुन शेतकरी संघटनेतर्फे या जाहिरनाम्याची होळी करण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाणे, जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, प्रभाकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य उध्दव पाटील, पुरुषोत्तम पाटील, सागर पाटील, नाना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
विविध मागण्यासंदर्भात दिले निवेदन
संतोष पाटील यांनी जाहिरनाम्याची होळी केली. यानंतर आपल्या विविध मागण्यांसंदर्भात तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.