एकता फाऊंडेशनचा उपक्रम
बोदवड – बोदवड येथेे एकता फाऊंडेशनतर्फे आयोजीत इज्तेमाई शादीयाँ या सामुहिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबध्द झाली.
एकता फाऊंडेशनतर्फे आयोजीत या सोहळ्यात नववधुला गिफ्ट म्हणून प्रत्येकी १ पलंग ,१ गादी, ब्लँकेट, कपाट, पंखा,५ मोठे ५ लहान भांडे,घड्याळ, अशा संसारोपयोगी वस्तु देण्यात आल्या. यात विशेष म्हणजे हिंदू बांधवांतर्फे गिफ्ट देण्यात आले. या कार्यक्रमाला मलकापुरचे आमदार चैनसुख संचेती,भुसावलचे आमदार संजय सावकारे, खासदार रक्षाताई खड़से, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल, वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर, काँग्रेसचे उदय पाटिल, सईद बागवान,मधु राणे, कैलास चौधरी, कैलास माळी, अनंता कुलकर्णी, हरिओम जैस्वाल उपस्थित होते.
या सोहळ्यात १३ जोडपी विवाहबध्द झाली. तसेच या सोहळ्यासाठी सूरत, खामगांव, बुलढाणा, धामनगांव बढे, रोहीणखेड ठिकाणी मारूळ येथील मौलाना शकील व बोदवडचे मौलवी अमीन, मौलवी इश्तियाक यांनी धार्मिक प्रवचन दिले.