बोदवड- शहरातील भिलवाडी भागातील 14 वर्षीय तरुणीस फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी संशयीत आरोपी विशाल ओंकार पवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेच्या आईने या प्रकरणी बोदवड पोलिसात फिर्याद दिली असून 24 नोव्हेंबर रोजी विशाल पवारने फुस लावून आपल्या मुलीला पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तपास उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहेत.