बोदवड शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमी निलगायीचा मृत्यू

0

बोदवड- मोकाट कुत्र्यांनी दिड वर्षीय निलगायीवर हल्ला चढवल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. 30 रोजी रात्रीच्या वेळी साकला कॉलनीमधील अशोक देशपांडे यांच्या घराजवळ निलगाईवर कुत्र्यांनी हल्ला चढवला होता तर यावेळी देशपांडे यांनी कुत्र्यांपासून निलगायीला वाचवले होते मात्र निलगाईच्या गळ्यावर आणि मांडी जवळ तीव्र आशा स्वरूपाच्या जखमा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी वनपाल किशोर वराडे यांना घटन कळवल्यानंतर त्यांनी साळशिंगी गावाजवळील नर्सरीत अण्णा काटे, अशोक पाटील, विकास पाटील यांच्या उपस्थितीत निलगायीचा मृतदेह दफन केला.