बोदवड शहरात कृषी केंद्र फोडले : 25 हजारांचा मुद्देमाल लांबवला

0

बोदवड- जिल्हा परीषदेचे माजी सदस्य अनिल खंडेलवाल यांच्या मालकीच्या मलकापूर रोडवरील खंडेलवाल कृषी केंद्रातून चोरट्यांनी 21 हजार 500 रुपयांच्या रोकडसह मोबाईल व डीव्हीएम मिळून एकू 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी सत्यनारायण खंडेलवाल यानी बोदवड पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले मात्र औषधी दुकानामुळे चोरट्यांचा माग काढण्यास अडचणी आल्या. दरम्यान, या दुकानाशेजारीच रूपम प्रोव्हीजन असून तेथील सीसीटीव्हीत चार चोरट्यांची छबी कैद झाले असून चोरटे मलकापूरकडे आल्याचा संशय आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आर.व्ही.महाजन करीत आहेत.