बोदवड शहरात तिरंगा पदयात्रेने वेधले लक्ष

0

अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेतर्फे आयोजन

बोदवड- अभाविपने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 69 मीटर अखंड तिरंगा पदयात्रेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. सुरुवातीला भारत मातेचे पूजन करण्यात आल्यानंतर अभाविपचा झेंडा दाखवून पदयात्रेला दीपक पाटील, प्रमोद कराड, नितीन झाल्टे, अरविंद चौधरी, अजय पाटील, प्रमोद सोनवणे, विशाल माळी यांनी सुरुवात केली. तिरंगा पदयात्रेला कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातून भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने सुरवात झाली तर प्रभातफेरीमार्गे गांधी चौकात ती पोहोचल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. विशाल माळी यांनी प्रास्ताविक तर अभाविचा परीरचय प्रमोद सोनवणे यांनी करून दिला. प्रमुख वक्ते प्रमोद कराड म्हणाले की, देशभरात अनेक ठिकाणी आज तिरंगा पदयात्रा काढण्यात येत आहे. जेएनयूत घडणार्‍या देशद्रोही घटनांना या माध्यमातून हा इशारा आहे. देशात ज्यांना-ज्यांना असुरक्षीतता वाटते त्यांनी देश सोडून गेले तरी हरकत नाही, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन दर्शना वर्मा तर आभार स्वप्नील वंजारी यांनी मानले. राम शर्मा, अश्विनी बडगुजर, राजू गंगतीरे, कृष्णा माळी, अतुल सोलंकी, पल्लवी पाटील, अजय खवले यांनी परीश्रम घेतले.