बोदवड शहरात हरभरा खरेदीचा शुभारंभ

बोदवड : यशोदाई ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि.वराड, ता.बोदवड यांच्यामार्फत नाफेड महाएफपीसी अंतर्गत शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ नुकताच झाला. कोरोनाच्या या संकटकाळात शेतकरी हवालदील झाला असताना शेतकर्‍यांच्या हरभरा या पिकाला सरकारने पाच हजार 100 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे. शेतकरी श्रीकृष्ण हरी पाटील यांचा हरभरा खरेदी करून त्यांचा सत्कार करून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल वराडे व बोदवड शहरातील प्रतिष्ठित शेतकरी तथा दि बोदवड सार्वजनिक को- ऑप. सोसायटीचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्याहस्ते खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ बोदवडचे साठा-अधीक्षक पी.एस.चौधरी, कंपनीचे चेअरमन पुरुषोत्तम पाटील, भाऊराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शांताराम चौधरी, सत्यनारायण खंडेलवाल, प्रतिष्ठित शेतकरी कैलास बडगुजर, कंपनीचे सीईओ निलेश भाऊराव पाटील, उत्तम नायसे, धनराज पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, किरण वंजारी, प्रदीप बडगुजर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव राजू कालबैले, हर्षल बडगुजर, पंडित कोकाटे, साहेबराव पाटील, राजू काळे, विजय पाटील, सौरभ पाटील, रवी मराठे, जिया शेख, योगेश शेळके, विनोद काळे आदी व शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. हरभरा विक्रीसाठी आणताना योग्य तो माल म्हणजे आर्द्रता 12 टक्के व स्वच्छ माल खरेदीसाठी आणावा, असे आवाहन निलेश पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.