बोदवड- शहरातील वरणगाव रोडवरील बोहराजी हार्डवेअर, बाबजी स्टिल या दुकानाच्या बाजुजी भिंत फोडुन रोख रक्कम आठ हजार चारशे रुपयांची रोकड तर 40 हजार रुपयाचे सामान अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी मुर्तजा केजार पाटा (24, रा.मराठा मंगल कार्यालय, मलकापूर) यांनी पोलिसात तक्रार दिली. 27 ते 28 दरम्यान चोरट्यांनी दुकानाची भिंत तोडुन नऊ हजारांचे दोन पंखे, मार्बल कटर, हँड ग्रँन्डर, इलेक्ट्रीक काटा, कटींग व्हिलमंगल वेंडींग रॉड, स्रु सहा ब्कॉक्स, वेल्डिंग होल्डर, पॉवर केबल असा एकूण 40 हजार 400 रुपयांचा माल लांबवला. तपास कालिचरण बिर्हाडे करीत आहेत.