बोदवड शहर निर्जतुकीरणासह नाल्यांची साफसफाई करा

0

बोदवड : कोरोना महामारीने संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात जागतिक थैमान घातले असून या संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना या आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण बोदवड शहर निर्जंतुकिकरण करावे, शहरातील गटारी व नाल्यांची साफ सफाई करावी व रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याअगोदर निर्जंतूक पाईपलाईन बदलवावी अशी मांगणी शिवसेनेतर्फे मुख्याधिकार्‍यांना करण्यात आली.

या मागणीसाठी दिले निवेदन
निवेदनात शहरात कोरोना विषाणुचा धोका पाहता शहरात निर्जंतुकीकरण करण्यात यावे तसेच शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही जीवनावश्यक वस्तूंच्या फळ, पालेभाज्यांच्या दुकाने लावली जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहरातील लोक खरेदी करण्यासाठी येत असतात त्या संपूर्ण परीसरात निर्जंतुकीकरण करावे तसेच काही दिवसात पावसाळा लागणार आहे शिवाय शहरातील गटारी व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे व गटारीतील पाणी रस्त्याने व काही लोकांच्या घरात शिरते व मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान लोकांचे होण्याचा धोका आहे म्हणून लवकरच शहरातील गटारी व नाले साफ करावे जेणेकरून जनतेला संभाव्य धोक्यापासून वाचवता येईल व नगरपंचायतीने शहराच्या विकास आराखड्याचे नियोजन करत असताना अगोदर गटारीचे बांधकाम करून व निर्जंतूक पाईपलाईन बदलवून नंतर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करायला पाहिजे होते परंतु असे न करता शहरात रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे याकडे लक्ष घालून अगोदर गटारीचे काम करून लवकर निर्जंतूक पाईपलाइन बदलवावीख अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना शिवसेनेचे गोपाळ सोनवणे (मुक्ताईनगर), गजानन खोडके, शांताराम कोळी, सुनील बोरसे (अपक्ष नगरसेवक), कलीम शेख, हर्षल बडगुजर, नईम खान, गोपाल पाटील, संजू महाजन, समीर शेख, भास्कर गुरचळ, विजय चौधरी, आतिष सारवान, पंकज वाघ, आनंदा पाटील यांच्यासह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते निवेदन देतेवेळी हजर होते.