बोदवड : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ शहरात बुधवारी भरणारा आठवडे बाजार भरलाच नाही तर व्यापार्यांनी शहर कडीकडीत बंद ठेवला. दलित बांधवांनी मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले. निर्दयी हल्लेखोरांची सीबीआय चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, या आशयाची मागणी भीमसैनिकांतर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात व डीवायएसपी सुभाष नेवे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेची नैतीक जवाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. भन्ते अशोक किर्ती, नागसेन सुरळरकर, जिल्हा उपाध्यक्ष रिपाइं गवई गट व भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा सचिव गोपीचंद सुरवाडे, रिपाइं तालुकाध्यक्ष संजय तायडे, उपाध्यक्ष सदानंद वाघ, गोविंदा तायडे, सुरेश तायडे, जयेंद्र मोरे, सुरेंद्र पालवे, विजय सुरवाडे, मनोहर सुरवाडे, युवराज तायडे, राजु इंगळे, जगन गुरचळ, सुभाष इंगळे, सुपडु जवरे, जीवन सुरवाडे यांच्यासह तालुक्यातील विविध आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.