बोदवड स्थानकावर तपासणी मोहिम : दोन लाखांचा दंड वसुल

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या बोदवड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने राबवण्यात विशेष मोहिमेत मंगळवारी 403 विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांसह अन्य रेल्वे नियमांचे उल्लंघण करणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येवून एक लाख 90 हजार 160 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. भुसावळ मंडळाचे वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.

दोन लाखांचा दंड वसुल
37 तिकीट निरीक्ष तसेच नऊ रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी राबवलेल्या मोहिमेत 403 विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून एक लाख 90 हजार 160 रुपये दंड वसुल करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणार्‍या 129 प्रवाशांकडून 50 हजार 380 रुपये दंड तसेच स्लीपर डब्यातून जनरल तिकीटावर प्रवास करणार्‍या 274 प्रवाशांकडून एक लाख 39 हजार 780 रुपये दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत एन.पी.पवार, हेमंत सावकारे, सी.डी.कंठे, निसार खान, अनिल खर्चे, एन.पी.अहिरवार, पी.वि.ठाकुर, पी.एम.पाटील, एस.एन.चौधरी, वाय.डी.पाठक, एस.एम.पुराणिक, पी.एच.पाटील, अरुण मिश्रा, दीपाली बोबडे, ज्योती निकम, एस.के.दुबे, विनय ओझा, डी.के.द्रिवेदी, एस.एस.जाधव, धीरज कुमार, एम.के.श्रीवास्तव, एस.के.दुबे, ए.एम.खान, सतीष कुमार व तिकीट कर्मचारी सहभागी झाले.