आमदार जगतापांची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चारही बाजूने लष्कराची हद्द आहे. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतून जाणारे रस्ते व इतर सुविधांबाबतचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. नुकतेच कॅन्टोन्मेंटमधील बंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्याचधर्तीवर बोपखेल, पिंपळेसौदागर येथील बंद रस्ते खुले करण्याची मागणी, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
बैठकीनंतर रस्ते चालू
याबाबत सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन पाठविले आहे. त्यात जगताप यांनी म्हटले आहे की, नुकतेच संरक्षण विभागाने कॅन्टोन्मेंटमधील बंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील कॅन्टोन्मेंटच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नुकतीच बैठक घेतली. त्यानंतर काही दिवसांतच कॅन्टोन्में
टमधील बंद रस्ते खुले करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.
त्यानुसार स्थानिक लष्करी प्रशासनाने मंगळवारी सकाळी पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लँक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिक
ांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळेसौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी
आमदार जगताप निवेदनाद्वारे केली आहे.