रोम । भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा साथीदार पाब्लो क्मयुवेस यांनी एटीपी इटालियन रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
बोपण्णा-क्मयुवेस यांनी एका सेटची पिछाडी भरून काढत सातव्या मानांकित फेलिसियानो लोपेझ व मार्क लोपेझ यांना संघर्षपूर्ण लढतीत 4-6, 7-6 (9-7), 10-8 असे नमवित आगेकूच केली. पावणेदोन तास झालेल्या या रंगतदार लढतीत बोपण्णा-क्मयुवेस यांना तीन ब्रेकपॉईंट्सच्या संधी मिळाल्या. पण त्यापैकी एकाचाही त्यांना लाभ घेता आला नाही. पहिल्या सेटमध्ये त्यांनी एकदा आपली सर्व्हिसही गमविली होती. त्यांची पुढील लढत चौथ्या मानांकित पीयर ह्युग्युस हर्बर्ट व निकोलास मेहुत यांच्याशी होणार आहे.